शिरूरचे प्रसिद्ध दानशूर उद्योगपती प्रकाशशेठ धारीवाल अयोध्येत विशेष अतिथी…

शिरूरचे प्रसिद्ध दानशूर उद्योगपती प्रकाशशेठ धारीवाल अयोध्येत विशेष अतिथी
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. २२/०१/२०२४.

शिरूरचे भूमिपुत्र व दानशूर व्यक्ती म्हणून संपूर्ण भारताला ज्ञात असलेले, जगप्रसिद्ध उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारीवाल व त्यांच्या पत्नी दिनाभाभी धारीवाल यांना पंतप्रधान कार्यालयाकडून, अयोध्या येथे श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले असल्याने, ही समस्त शिरुरकरांसाठी खूप अभिमानास्पद बाब असल्याचे, शिरूर येथील अनेक नागरिकांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना मत व्यक्त केले.
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील राममंदिर न्यासच्या वतीने या दोघा दांपत्यांचा सत्कार करण्यात आला असून, समस्त शिरूरकरांचे प्रतिनिधी म्हणून ऊद्योगपती धारीवाल दांपत्य त्या ठिकाणी उपस्थित राहिल्याने शिरूरकरांसाठी एक ऐतिहासिक आठवणींचा क्षण असल्याचे अनेकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *