महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केलेली थेरगाव, आकुर्डी हॉस्पिटल त्वरीत सुरू करा…नगरसेवक मयुर कलाटे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १९ मे २०२१
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णाची संख्या कमी होत आहे. मात्र, अद्याप कोरोनाचे संकट टळले नाही. महापालिकेने कोट्यावधी रूपये खर्च करून बांधलेली थेरगाव व आकुर्डी येथील रुग्णालय पडून आहेत. पावसाळ्याच तोंडावर अनेक साथीचे रोगावर उपचार करण्यासाठी नागरिकांनी कुठे जायचे. सध्या वायसीएम हॉस्पिटल संपूर्ण कोविड करिता राखीव ठेवले आहेत. सर्व रोगांचे ओपीडी व कोरोना केअर सेंटर मधील रुग्णांना प्राथमिक उपचार या नवीन रुग्णालयात द्यावे.

       या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग, तपासणी कक्ष, ‘क्ष’ किरण तपासणी, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृह, उपाहारगृह, चोवीस तास औषधालय, शस्त्रक्रिया कक्ष, पुरुष व महिलांचा मेडिकल वॉर्ड, अतिदक्षता विभाग, पॅथॉलॉजी लॅब, प्रसूतिगृह व नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग, सर्जिकल विभाग, डे केअर वॉर्ड असे आकुर्डी रुग्णालयात प्रसूतिगृह व कुटुंबकल्याण केंद्रासाठी आवश्‍यक सुविधा आहेत. या सर्व गोष्टींचा संपूर्ण यंत्रणा नवीन रुग्णालयात देवून भविष्यात आकुर्डीचे हे रुग्णालय महिलांसाठी राखीव ठेवण्यात यावे.



     तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच प्राथमिक लक्षणे, उपचार आणि इन्फ्रास्ट्रक्चर महापालिकेने उभे करावे. स्वतःची ऑक्सीजन उत्पादन करण्याबाबत नियोजन करावे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी संसर्गजन्य आजार यावर उपचार करण्यासाठी पालिकेचे नव्याने उभारलेली आकुर्डी थेरगाव येथील रुग्णालय नागरिकांसाठी खुले करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *