अज्ञातांकडून निगडी बस स्टॉप च्या पी एम पीएल तिकिट केंद्राची तोडफोड

निगडी येथील पी.एम.पी.एल बस स्टॉप ह्या ठिकाणी काल रात्री दारू पिऊन धिंगाणा घालत काही टोळक्याने पी एम पी एल पास केंद्र तोडफोड केली असून त्या संदर्भात पी एम पी एल बस मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना निगडी बस स्टॉप ह्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच पी एम पी एल बस स्टॉप ह्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली असून पिंपरी चिंचवड शहरातील मुंबई पुणे महामार्गावर निगडी बस स्टॉप खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असलेलं ठिकाणं असून पिंपरी चिंचवड शहरातील तसेच पुणे शहरातील भागात बस प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवाशी निगडी बस स्थानक ह्या ठिकाणी येत असून त्या निगडी बस स्टॉप ह्या ठिकाणी बस मध्ये प्रवाशी चढत असताना तसेच प्रवाशी बस मधून उतरत असताना चोरटे मोबाईल चोरी घटना वारंवार घडत असून खिशातून पाकिटे व पर्स चोरी घटना वारंवार घडत असून सोनं चोरी घटना घडल्या असून निगडी बस स्टॉप ह्या ठिकाणी पी एम पी एल बस मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना ताबडतोब दखल घेऊन निगडी बस स्थानक ह्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत म्हणून मागणी करण्यात आली तसेच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली असून काल रात्री दारू पिऊन रसवंती गृहात बसलेल्या तरुणांनी पी एम पी एल बस पास केंद्र तोडफोड केली असून त्या संदर्भात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा म्हणून मागणी करण्यात आली असून निगडी बस स्टॉप ह्या ठिकाणी चारही बाजूंनी अतिक्रमण करून टपरी पथारी धारक ह्यांनी अतिक्रमण केले असून त्या मुळे प्रवाशी बांधवांना बस स्टॉप ह्या ठिकाणी बस मध्ये चढताना व उतरताना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत असून निगडी बस स्टॉप येथील जागा कमी पडत असून पी एम पी एल बस निगडी बस स्टॉप ह्या ठिकाणी एका वेळी पाच ते सहा उभ्या करण्यात येत असून गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असून त्यांच्या फायदा चोरांना चोरी करण्यासाठी होत असून चोरीचा घटना वारंवार घडल्या असून त्या संदर्भात कडक कारवाई करण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली आहे सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *