संत तुकाराम नगर येथे “गरबा व दांडिया” स्पर्धेचे आयोजन

धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने संत तुकाराम नगर पिंपरी येथे कोजागिरी पोर्णिमे निम्मित भव्य ‘दांडिया व गरबा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम नगर,पिंपरी या ठिकाणी आयोजित या स्पर्धेत परिसरातील महिला भगिनींसह तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेतून उत्कृष्ट दांडीया,उत्कृष्ट गरबा यासह उत्कृष्ट वेशभूषा या तीन प्रकारांमधून पारितोषिके देण्यात आली. या मध्ये उत्कृष्ट वेशभूषा या प्रकारातून सोनाली मिसाळ,प्रतिभा वानखेडे व पल्लवी लहाने तर उत्कृष्ट दांडिया मध्ये विद्या समुद्रे,अवनी शर्मा हिने तर प्रिया ढेरंगे व अनिता वाघ यांनी संयुक्त रीत्या अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके पटकावली. उत्कृष्ट गरबा या प्रकारातून वैदही पवार, सारिका गायकवाड व स्वरा शिंदे यांनी तर सांघिक मधुन थेरगाव येथील ‘कृष्ण कलापथक’ यांनी पारितोषिक मिळवले..


दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त
धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष देविदास म्हात्रे व नीलम संतोष म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
यंदाच्या वर्षी ही या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला…
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित भोसले संघटक सुनील ढोकळे गौतम लहाने सागरभाऊ रेवाळे भोलाराम पाटील प्रिया निकम विजया रेवाळे विजय ढोबळे परवेज शेख कार्तिक वाघ रोहित महाडिक मनीष म्हात्रे यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *