अजित पवार यांना मोठा धक्का!आझम पानसरेंचा शरद पवार गटाला पाठिंबा

 प्रतिनिधी-प्रसन्न तरडे.

पिंपरी चिंचवडचे आझमभाई पानसरे यांनी शरद पवार यांची भेट घेउन जाहीर समर्थन दिले आहे.
पिंपरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांची राजकीय खेळी,
पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेउन असणारे एक नेते म्हणजे आझमभाई पानसरे याना कामठे यांनी  आपल्याकडे वळवले आहे.
आझमभाई यांना मानणारा वर्ग पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कामठे यांच्या राजकीय खेळीने येणाऱ्या काळात पानसरे यांचा शरद पवार पवारांना पाठिंबा हा भाजप आणि अजित पवार गटाची चिंता वाढवू शकतो. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सोमवारी पिंपरी चिंचवडचे जेष्ठ नेते माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, ज्येष्ठ नेते शिरीष जाधव, युवा नेते निहाल पानसरे आदी उपस्थित होते. आझम पानसरे यांच्या शरद पवार गटाला भेटलेल्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला बळ मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *