माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्या नमो थाळी उपक्रमाचे चित्रा वाघ यांनी केले कौतुक

बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक

दि १६ ऑक्टोबर (शुक्रवार)
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड व माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी राबविलेल्या नमो थाळी या उपक्रमास आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांनी सदिच्छा भेट दिली , व त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

त्यांच्या समवेत भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे भाजपा प्रदेश सदस्य श्री सदाशिव खाडे, नगरसेविका सुजाता पालांडे तसेच भाजप युवा मोर्चा चे विवेक महाजन उपस्थित होते..