नगरसेविका महिलांचा रांका ज्वेलर्स चिंचवड च्या वतीने सन्मान

पिंपरी चिंचवड
०१ ऑक्टोबर २०२२


दिनांक-२६ सप्टेंबर पासून सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सगळीकडे विविध कार्यक्रम गरभा, दांडिया यांची धामधूम दिसून येत आहे. सर्वच महिला वर्गामध्ये एक प्रकारचे चैतन्य पाहावयास मिळत आहे. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून एक समाजिक बांधिलकी जपत रांका ज्वेलर्स चिंचवड यांच्या वतीने विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा सन्मान केला जात आहे.

सन्मान नवदुर्गेचा, जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमांअर्तगत रांका ज्वेलर्स चिंचवड व आपला आवाज आपली सखी यांच्या वतीने दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी नवरात्रीची पाचवी माळ, रंग हिरवा, देवीचे रूप स्कंदमाता यांचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय व समाजिक क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्य करणा-या आजी व माजी नगरसेविका महिलांना सन्मान नवदुर्गेचा, जागर स्त्री शक्तीचा या सन्मानाने आशा रांका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

आपले सण समारंभ म्हणजे स्त्री मनाचा जणू आरसाच असतो. स्त्री मुळेच एखाद्या सणाला नवचौतन्य लाभते. आजची स्त्री फक्त घरातच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील यशस्वीरीत्या आपले स्थान निर्माण करू शकते हे तिने तिच्या समाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्याने सिध्द केले आहे.

नेहमीच समाजाच्या प्रगतीसाठी झटणा-या सामाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावणा-या समाजीक कार्यकर्त्या नेहमीच इतर महिलांवर्गासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात परंतु आज त्यांच्या स्वतःसाठी रांका ज्वेलर्सच्या वतीने त्यांचा दालनात असलेले नवनवीन डिजाईन चे ब्रायडल कलेक्शन चे दागिने परिधान करून असे फोटोशूट करण्याची संधी रांका ज्वेलर्स च्या आशा रांका व आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगिता तरडे यांनी दिली त्या बद्दल सर्व उपस्थित नगरसेविका महिलांनी रांका ज्वेलर्स यांचे आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *