पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही; पंढरपूरच्या पराभवाचा वचपा काढणारच – नाना काटे

पिंपरी, दि. २२ –

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ नये तसेच घड्याळ चिन्हावरच लढावे, असा प्रचंड बहुमताचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारणीत नुकताच करण्यात आला. याच विषयावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधीनेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.२१) प्रत्यक्ष भेटून त्याबाबत आम्हा कार्यकर्त्यांच्या भावना किती तीव्र आहेत तेसुध्दा सांगितले. बिनविरोध होणार नाही, असे खुद्द अजितदादांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट सांगितले. अशा परिस्थितीत पूर्वी आमदार लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीतच होते आणि त्यांनी पक्षासाठी मोठे काम केले म्हणून माणुसकिच्या भावनेतून बिनविरोध निवडणुक व्हावी, अशी भावना आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. लोकशाहित मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे, यात दुमत नाही. मात्र, हाच जर का निकष लावायचा असेल तर मग पंढरपूर, मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भालके यांचे निधन झाले होते त्यावेळी भाजपला महाराष्ट्रातील राजकीय परंपरा दिसली नाही का, त्यावेळी माणुसकी कुठे गेली होती, असा रोखठोक सवाल माजी विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी प्रसिध्दीपत्रकातून उपस्थित केला आहे. पंढरपूर-देगलूर पोटनिवडणुकित कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म, असा सवाल काटे यांनी भाजपला केला आहे. सर्व ताकदिनीशी ही निवडणूक लढणारच, असा निर्धार राष्ट्रवादीने केल्याचे त्यांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले.

पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही, पंढरपूरच्या पराभवाचा वचपा काढणारच, असा निर्धार व्यक्त करून नाना काटे पत्रकात म्हणतात, भाजपला इतर पक्ष संपवायचे आहेत. त्यांना विरोध कऱणाऱ्यांना ते ई