पत्नीचा खून करणारा 27 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी : २७ वर्षांपूर्वी पत्नीचा खून करून फ़रार झालेल्या पतीला अटक करण्यात पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनीट १ च्या पथकाला यश मिळाले आहे. त्याने १९९५ साली भोसरी पोलीस ठाणे हद्दीत आपल्या पत्नीच्या डोक्यात दगडी उखळ घालून तिचा खून केला होता.

आणखी एक आरोपी पोलिसांच्या हाती

वरील तपास मोहिमे दरम्यान भोसरी पोलीस ठाण्यातच दाखल असलेल्या आणखी विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी हा फरार होता. त्या आरोपीचे मूळगाव देखील कोळनूर, लोहारा येथील रहिवासी असल्याने समांतर तपास करत पोलीस पथकाने  महेश भिमराव कांबळे याला देखील पोलिसांनी अटक केले.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एकेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी कानडे व पोलीस हवालदार फारुक मुल्ला,पोलीस नाईक प्रमोद हिरळकर, पोलीस शिपाई मारुती जायभाये, पोलीस नाईक मोरे, पोलीस शिपाई रुपनवर यांनी केली. तसेच तांत्रिक तपास हा पोलीस हवालदार नागेश माळी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *