‘आपला आवाज, आपली सखी सन 2023’ आयकार्ड व गिफ्ट उदघाटन समारंभ दिमाखात संपन्न

दि. ११/०१/२०२३
पिंपरी चिंचवड


पिंपरी चिंचवड : आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे विभागप्रतिनिधी व स्पाॅन्सर यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.10 जानेवारी रोजी संपन्न झाला.

पिंपरी चिंचवड शहरात मागील तीन वर्षापासून आपला आवाज आपली सखी हे महिलांसाठी सन्मानाचे व्यासपीठ म्हणून काम करत आहे,या महिला फोरमच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड व परिसरांतील असंख्य महिला ‘आपला आवाज, आपली सखी’ या परिवारात सहभागी झाल्या आहेत. या फोरमच्या माध्यमातून महिलांसाठी वर्षभरात व्यावसायवाढ,मनोरंजन कार्यक्रम,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

‘आपला आवाज, आपली सखी सन 2023’ आयकार्ड व गिफ्ट उदघाटन व दिपप्रज्वलन अतुल परदेशी, मुख्य संपादक, आपला आवाज न्यूज नेटवर्क, संगीता तरडे, संचालिका, ‘आपला आवाज, आपली सखी’ लखीचंद कटारीया, संचालक, सुनिती ज्वेलर्स,अक्षदा मोहिते, संचालिका, स्वर्णिम ज्वेलर्स,मनीषा गव्हाणे, संचालिका, एल 2 एल सलोन स्पा व इन्स्टिट्यूट यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात सन 2022 मध्ये झालेल्या सर्व कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. उपस्थित विभाग प्रतिनिधीना संगिता तरडे, संचालिका, आपला आवाज आपली सखी यांनी 2023 सभासद नोंदणी साठी मार्गदर्शन केले. 2022 मधील विजेत्या विभागप्रतिनिधी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. तसेच 2022 मध्ये उत्कृष्ट कार्य केल्यामुळे सर्व उपस्थित विभागप्रतिनिधी यांना गिफ्ट वाटप करण्यात आले.

कार्यक्रमांसाठी उपस्थित मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपला आवाज आपली सखीला पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या. तसेच विभागप्रतिनिधी यांनी आपले अनुभव व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता तरडे, संचालिका आपला आवाज आपली सखी यांनी केले; तर आभार सोनाली जाधव यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *