दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला टँकरची धडक

दि. ०७/०१/२०२३
खेड -रत्नागिरी


खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या गाड़ीला रायगड जिल्ह्याच्या हददीत कशेडी घाटानजीक शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातातात स्वतः: योगेश कदम आणि त्यांचे तीन सहकारी किरकोळ जखमी झाले आहेत.

आमदार कदम खेडहून मुंबईकडे जात होते. त्यांच्या पुढे त्यांना संरक्षण देणारी पोलिसांची गाडी होती. कदम यांची गाडी कशेडी घाटात चोळई नजीक आली असता मागून येणाऱ्या एका टँकरने आमदार कदम यांच्या गाडीला मागून जोराने धडक दिली. त्यामुळे त्यांची गाड़ी पुढे असलेल्या पोलीसांच्या गादीवर आदळली. तर टँकर जागीच उलटला. या अपघातात आमदार कदम, त्यांचा चालक आणि अन्य एका व्यक्ती किरकोळ दुखापत झाली. अंधाराचा फायदा घेऊन टॅंकरचालक अपघातस्थळावरून पसार झाला.

कदम यांचा चालक दीपक कदम याला चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरीता नेण्यात आले. या घटनेनंतर कार्यकर्त्यात संभ्रम पसरू नये म्हणून आमदार कदम यांनी स्वतः: व्हिडीओ संदेशाद्वारे आपण सुखरूप असल्याची माहिती दिली.

दरम्यान हा अपघातात असावा की घातपाताचा प्रयत्न अशी चर्चा सुरू झाली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *