पिंपळे सौदागर येथे २५ वाहनांची तोडफोड
दि. ०२/०१/२०२३
पिंपरी
पिंपरी : पिंपळे सौदागर येथे रविवारी पहाटे रिक्षातून आलेल्या एका मद्यपी टोळक्याने सुमारे २५ वाहनांची तोडफोड केली. पोलिस घटनास्थळी येण्यापूर्वीच या टोळक्याने पोबारा केला.
कोकणे चौक ते महादेव मंदिर परिसरात हा प्रकार घडला. यामध्ये रिक्षा, टेम्पो, बस, कार आदी वाहनांच्या काचा त्या टोळक्याने फोडल्या. रात्री दिडच्या सुमारास हे टोळके तेथे आले आणि त्यांनी कोयते आणि सिमेंटचे ब्लॉक्स यांच्या साहाय्याने वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. परंतु घटनास्थळी पोलीस पोहोचण्यापूर्वी टोळके पसार झाले. पोलीस सीसीटीव्हीही फुटेजच्या आधारे गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.