राजकीय सुडापोटी कोणतीही कारवाई केली जाणार नाही – मुख्यमंत्री शिंदे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ नोव्हेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वातारण तापले आहे. यावर सगळेच राजकीय पक्षच नेते आपली प्रतिक्रिया देत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहित नाही. परंतु, या प्रकरणात पोलिस नियमानुसार चौकशी करतील. संबंधित महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल तर पोलिस आपले काम करतील. आम्ही कोणत्याही सुडापोटी कारवाई करत नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *