शंभूराज देसाई यांची आमदारकी रद्द करा; ठाकरे गटाची मागणी

२७ डिसेंबर २०२२


विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाने शिंदे गटातील आणखी एका मंत्र्याला लक्ष्य केले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विधानसभेत अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.यातच आता अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यानंतर आता शंभूराज देसाई अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संजय राठोडनंतर आता ठाकरे गटाच्या निशाण्यावर शंभूराज देसाई

शंभूराज देसाई यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात या जमिनीचा शेतजमीन म्हणून उल्लेख आहे, परंतु प्रत्यक्षात या जमिनीवर निवासी बांधकाम केलेले आहे. सदरील जमीन ही इकोसेन्सेटिव्ह झोन मध्ये येत असल्यामुळे बांधकामास परवानगी नाही, ही बाब ठाकरे गटाने समोर आणली आहे. विशेष म्हणजे ही जमीन ही स्वतः शंभूराजे देसाई यांच्या नावावर आहे. स्वतः लोकप्रतिनिधी असल्याने त्यांनीच अतिक्रमण तथा अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *