आम आदमी पार्टी तर्फे मोदी सरकारच्या शेतकरी धोरणाचा पिंपरी येथे निषेध

बातमीदार : रोहित खर्गे
विभागीय संपादक

दि. २४ सप्टेंबर
आज आम आदमी पार्टी तर्फे मोदी सरकारच्या शेतकरी विरुद्ध धोरणाचा निषेध करण्यात आला. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे काळ्या फिती लावून घोषणा देत निषेध नोंदवला. हे कायदा बाजार संपवणारे आहेत, बाजार राहिला नाही तर मोठे भांडवलदार शेतकऱयांना पिळून काढतील व भिकेला लावतील असे आपचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनुप शर्मा म्हणाले. तसेच हा कायदा छोट्या retailer यांना ही घातक आहे. उद्या apmc घाऊक बाजारच राहिला नाही तर छोट्या रेटलेर ला अंबानी अडाणी सारख्या भांडवलदारांच्या godown मधूनच माल घ्यावा लागेल आणि त्यांचे स्वतःचे रिटेल पण असल्याने छोट्या दुकानदाराने ते दुजाभावाची वागणूक देणार.. म्हणून छोट्या रेटलेर नि पण शेतकार्यासोबत येऊन खांद्याला खांदा लावून या बिल ला विरोध करावा असे मत आपचे प्रवक्ते कपिल मोरे यांनी मांडले.


यावेळी आपले चे राघवेंद्र राय, स्वपनील जेवले, राजेंद्र काळभोर, स्मिता पवार, वहाब शेख, सागर सोनवणे, सारफराज मुल्ला, , नंदू नारंग, आधी पदाधिकरो व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *