मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालावी लावेल अशी कोणाच्या बापाची हिंमत नाही – देवेंद्र फडणवीस

२६ डिसेंबर २०२२

नागपूर


राज्य सरकारने अद्यापही कर्नाटक सरकारविरोधात ठराव मांडला नसल्याने विरोधकांनी टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वात प्रथम भाष्य करत आज ठराव मांडायला हवा होता असं सांगितलं. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किंवा उद्या ठराव मांडला जाईल अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

अमित शाह यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बोलावून घेतलं आणि संयम पाळण्यास सांगितलं होतं. पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री वाटेल ते बोलतात, हे आपण उघङड्या डोळ्याने पाहायचं का?अशी टीका भासकर जाधव यांनी केली होती. भास्कर जाधव यांच्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की,या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला मान खाली घालावी लावेल अशी कोणाच्या बापाची हिंमत नाही. जसं ते म्हणतात तसं आपणही इंच इंच लढू. केंद्रात, सर्वोच्च न्यायालयात आपण मराठी बांधवांवरील अन्याय दूर करण्यासाठी हवं ते करु,असं फडणवीस म्हणाले.मागील आठवड्यातील वातवारण गंभीर असल्याने ठराव येऊ शकला नाही. आज ठराव येणार होता, पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होत. त्यासाठी जाणं महत्त्वाचं होतं. ते दुपारी येणार आहेत. ते आल्यानंतर आज किंवा उद्या ठराव मांडू. यासंदर्भात तसूभरही महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही,” असं आश्वासन त्यांनी विरोधकांना दिलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *