धनंजय महाडिक, राज्यसभा निवडणूक विजयी उमेदवार

अतुल परदेशी
मुख्य संपादक
११ जून २०२२

मुंबई


राज्यसभा निवडणूक भाजपचे धनंजय महाडिक विजयी

BJP's Dhananjay Mahadik
भाजपचे धनंजय महाडिक

आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून काही काळ लांबणीवर पडलेली मतमोजणी सात तासा नंतर पार पडली आणि निकाल जाहीर करण्यात आले. यात भाजपने दोन जागांवर विजय मिळवला तर शिवसेनेचे दोन,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रत्येकी एका उमेदवाराने विजय मिळवला आहे. भाजपाकडून धनंजय महाडिक,अनिल बोंडे, पीयूष गोयल हे रिंगणात उतरले होते तर शिवसेनेकडून संजय पवार आणि संजय राऊत, काँग्रेसक़डून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उमेदवार होते.यात खरी लढत ही साहव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार व भाजप चे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यात होती.

शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव

राज्यसभेची साहवी जागा आम्हीच जिंकू आमचे संख्याबळ आणि मतांची बेरीज जास्त आहे म्हणा-या शिवसेनेला भाजपने आस्मान दाखवत विजय मिळवला आहे.मतदान प्रक्रिया पार पडल्या नंतर मतमोजणी आधी भाजप आणि मविआ यांनी काही आमदारांनी केलेल्या मतदान प्रक्रियेवर अक्षेप घेतल्याने निकाल प्रक्रिया उशिरा पार पडली आणि तब्बल सात तासा नंतर वादग्रस्त ठरलेले काही मतदान बाद ठरवत निकाल जाहीर करण्यात आला.

धनंजय महाडिक यांचा विजय आमदार लक्ष्मण जगताप आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित करतो – देवेंद्र फडणवीस

चौकट
विजया नंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय हा पिंपरी-चिंचवड भाजप चे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि पुणे भाजप आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित करतो असे म्हणत आमदार लक्ष्मण जगताप व आमदार मुक्ता टिळक यांचे कौतुक केले आहे. भाजपच्या दोघेही आमदारांनी प्रकृती बरी नसतानाही मतदानाचा हक्क बजावत राज्यसभेचे भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचला असल्याचे निवडणूक निकाला नंतर दिसून आले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *