“दारिद्र्यरेषा ठरली,श्रीमंतीची रेषाही ठरवावी.” : पुरुषोत्तम सदाफुले

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१० फेब्रुवारी २०२२

पिंपरी


सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राबायचे कामाच्या वेळा निश्चित नव्हत्या, जेवणाची सुट्टी मिळत नव्हती ब्रिटिशांनी खुप त्रास दिला तरी त्यांना न जुमानता रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना त्यांचे हक्क, सुट्टी, वेतन मिळवून दिले. त्याच प्रमाणे नव्या युगातील ब्रिटिश प्रवृत्तिला दूर करून कामगार हक्कासाठी पुन्हा एकदा जोमाने लढा देऊ या असा निर्धार कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पुणे आयोजित चिंचवड येथे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रसंगी सर्वानुमते करण्यात आला.

नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला जनाबाई साळवे , सुनिता पोतदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्याख्याते , कामगार भूषण पुरुषोत्तम सदाफुले, अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रमुख पाहुणे कवी सुरेश कंक, कवी राजेंद्र वाघ, प्रदेश संघटक अनिल बारवकर,क्रांतिकुमार कुडाळकर, सहित्यिक मधुश्री ओव्हाळ, चंद्रकांत कुंभार, राजेश माने, नाना कसबे,सालिम डांगे, शोभा जोशी, वर्षा बालगोपाल,अशोक गोरे, दिलीप ओव्हाळ, रामचंद्र प्रधान, ओमप्रकाश मोरया,माधुरी जलमुलवार,नंदा तेलगोटे,आनंद गायकवाड, तुकाराम माने , सूरज देशमाने आदीसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कारार्थी कामगार सुरक्षारक्षक आत्माराम हारे ,कामगार कवयित्री फुलवती जगताप,हातगाडीधारक जरिता वाठोरे यांना नारायण मेघाजी लोखंडे स्मृती श्रम प्रतिष्ठा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नारायण मेघाजी लोखंडे स्मृतिदिनानिमित्त, व्याख्यान व पुरस्कार प्रदान.

पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले “सन अठराशेच्या कालावधीमध्ये कामगारांना एकत्रित करणे त्यांचे संघटन करणे अत्यंत अवघड काम होते या कालावधीमध्ये पुढाकार घ्यायचे त्यांना कामावरून काढून टाकले जायचे अशा स्थितीमध्ये कामाच्या वेळा संपल्यानंतर कामगारांना वस्त्यांमध्ये जाऊन भेटून त्यांचे संघटन नारायण मेघाजी लोखंडे यांनी बांधले. कामगार आजारी असो व त्याचेवर काही संकट असलं तरी कामावर जाणे बंधनकारक होते कामगार करारभंग कायदा अशा कडक स्वरूपाचा होता त्यातून कामगारांना मुक्तता दिली आणि मुंबईमध्ये दहा हजार लोकांची सभा घेऊन कामगारांच्या मागण्या जेवणाची सुट्टी, रविवारची सुट्टी, त्याचबरोबर वेतन वाढ देण्यास ब्रिटिशांना भाग पाडले . सध्याचा काळ बदलला तसाच कामगारांच्या प्रश्नांमध्ये बदल झाला नव्या समस्या अनेक आहेत त्या सोडवण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जशी गरिबीची रेषा असते तशी श्रीमंताची रेषा ही कुठे तरी ठरली पाहिजे श्रीमंत कितीही श्रीमंत होत राहतो मात्र त्यांना अंतिम रेषा नाही, परिस्थिती बदलली पाहिजे.

नखाते म्हणाले की, “कोरोनाच्या कालावधीपासून परिस्थिती बदललेली आहे नव-नवे संकटे ऊभी राहिली आहेत हाताला काम नाही ,फक्त रोजगार वाढल्याचे चित्र निर्माण केले जातेय, कष्टकऱ्यांना दिवसभर प्रयत्न करूनही काम भेटत नाही अशा स्थितीमध्ये बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे.” सुरेश कंक म्हणाले की, “महिला कामगार संख्या अधिक आहे मात्र दुर्लक्षित आहेत त्या कामगारांना अडचणीच्या कालावधीमध्ये साथ देणे, हात देणे गरजेचे आहे . कामगार संघटना व साहित्याची सांगड़ घालुन पुढील कालावधी मध्ये काम करू या.” प्रास्ताविक राजेंद्र वाघ यांनी केली तर सिद्धनाथ देशमुख यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *