मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बसचा भीषण अपघात, ६ प्रवासी गंभीर जखमी

१९ डिसेंबर २०२२


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. हा भीषण अपघात खोपोली जवळ झाल्याची महिती समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर अपघात 6 प्रवासी गंभीर जखमी झालेत. जखमी झालेल्या व्यक्तींना नगरपालिका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बसला कंटेनरने पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेसवर वाहतुक कोंडी झाली आहे.

खोपोलीजवळ बोरघाटामध्ये कंटेनरने खाजगी बसला मागून धडक दिली त्यानंतर हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, बसची मागची बाजू पूर्ण फुटली आहे. कंटेनरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बसमध्ये एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात बसचा चालकाचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बस सिंधुदुर्गामध्ये लग्नासाठी गेली होती. कोल्हापूर मार्गे वाशिंदला परतताना बसला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेसवरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेची यंत्रणा घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरू आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *