माझ्या यशात निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकारांचा मोठा वाटा – प्रशांत दामले

१३ डिसेंबर २०२२
पिंपरी,पुणे


आपल्या‌ ३२ नाटकांचे साडेबारा हजार प्रयोग आता पर्यंत झाले आहेत. नवीन नायिका, सहकलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव याकडे कसं पाहता… काही क्षण थांबून प्रशांत दामले यांचे उत्तर… कपडे घालावे लागतात आणि ते बदलावे ही लागतात म्हणूनच प्रेक्षक मला सहन करत गेले. साडेबारा हजार प्रयोग करणे शक्य झाले… या उत्तराला उपस्थितांची भरभरून दाद… अशी शब्दांची फटकेबाजी करत दामले यांनी आपली प्रकट मुलाखत गाजवली. निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखा आणि शहरवासीयांच्या वतीने सोमवार (दि. १२ नोव्हेंबर) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते यांचा मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मिलिंद कुलकर्णी यांनी प्रशांत दामले यांची प्रकट मुलाखत घेतली. तसेच आमदार उमा खापरे यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशचे रविकांत वर्पे, अभिनेत्री ब्रिंदा पारेख, राजेंद्र बंग, किरण भोईर, सुहास जोशी आदी उपस्थित होते.

खा. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने दामले यांचा मानपत्र देऊन गौरव

पिंपरी चिंचवड सांस्कृतिक नगरी झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही करत होतो त्यावेळी शरद पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबरोबरच प्रा. रामकृष्ण मोरे यांचाही सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोठा वाटा असल्याचे आ. खापरे यांनी नमूद केले.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसचे रविकांत वर्पे यांनी प्रशांत दामले यांना पद्मभूषण किताब मिळाला पाहिजे अशी मागणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन श्रीकांत चौगुले यांनी, आभार किरण भोईर यांनी मानले. यावेळी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाट्य प्रयोगाचे मोफत आयोजन करण्यात आले होते. त्याला रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *