बैलगाडा शर्यतीतील लाईव्ह प्रक्षेपण बंद करणे गरजेचे – संदीप बोदगे अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटना.

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२६ ऑगस्ट २०२२

पुणे


लवकरच बैलगाडा शर्यती बाबत अंतिम सुनावणी माननीय सर्वोच्च न्यायालयात होणार आहे, त्यामुळे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करताना आयोजकांनी व सहभागी होणाऱ्या बैलगाडा मालकांनी महाराष्ट्र शासनाचे व माननीय न्यायालयाने दिलेले नियम तंतोतंत पाळणे गरजेचे आहे असे आवाहन अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे यांनी केले आहे.


या निर्णयामुळे ज्या बैलगाडा प्रेमींना प्रत्येक्षात घाटात जाऊन स्पर्धेचा आनंद घेता येत नव्हता ते घरी बसूनच LIVE च्या माध्यमातून आनंद घेत होते त्यांच्या आनंदावर आता विरजण पडणार आहे. पण संघटनेच्या हितासाठी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागत असल्याचे संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.

याचाच एक भाग म्हणून बैलगाडा शर्यतीच्या धावपट्टीवरील लाईव्ह प्रक्षेपण तात्काळ बंद करणे गरजेचे आहे, अर्थातच बैलगाडा शर्यतीचे ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार जे व्हिडिओ शूटिंग करणे आवश्यक आहे ते करायला हरकत नाही कारण त्या व्हिडिओ शूटिंग द्वारे तयार केलेली सीडी आपण माननीय जिल्हाधिकारी यांना सादर करत असतो. त्यामुळे येथून पुढे बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी कोणीही लाईव्ह प्रक्षेपण करू नये . फक्त व्हिडिओ चित्रीकरण करावे व ते माननीय जिल्हाधिकारी यांना सादर करावे असे आवाहन संदीप बोदगे अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे यांनी सर्व बैलगाडा स्पर्धा आयोजकांना आणि स्पर्धा प्रेमींना केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *