१३ डिसेंबर २०२२
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी देण्यात आली. शरद पवारांचा काल (सोमवारी, १२ डिसेंबर) वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी पवारांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.आरोपीने शरद पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी दिली.
सिल्वर ओकवरील टेलिफोन ऑपरेटर पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी ग्रामदेवी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
