संजय राऊतांनी तोंड आवरावं नाहीतर; शंभूराज देसाईंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचे प्रत्युत्तर

०७ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली होती. महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसलयं? संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देत इशारा दिला होता. संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, आताच साडेतीन महिन्यांचा आराम करून बाहेर आला आहेत. त्यामुळे पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. अशी वक्तव्य संजय राऊतांनी टाळावा,असं शंभूराज देसाई म्हणाले होते. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शंभूराज देसाईंच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ट्वीट करत संजय राऊतांनी म्हटलं की,मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही. कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील हाच अर्थ.

शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमा वादावर महाराष्ट्राला कर्नाटकआव्हान देत आहे.यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा. कायदा,न्यायालये,तपासयंत्रणा खिशात आहेत असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का?मी तयार आहे, असेही संजय राऊतांनी ट्विट करत सांगितलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *