रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? रोहित पवारांचा सरकारला सवाल

०७ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद हा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करत अडवणूक केली जात आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील आक्रमक होत आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकमध्ये न येऊ देण्याचा फतवा काढत आहे. त्यामुळे एकीकडे कर्नाटक सरकार आक्रमक होत असतांना महाराष्ट्राची भूमिका काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक ट्विट करून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?

आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू… करू… केंद्राशी बोलू… ही मूळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटक च्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही, असं ट्विट करत रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *