१ डिसेंबरपासून येणार डिजिटल रुपया

३० नोव्हेंबर २०२२


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १ डिसेंबरपासून रिटेलसाठी डिजिटल रुपया लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. किरकोळ डिजिटल चलनासाठी हा पहिला पायलट प्रोजेक्ट असेल. यादरम्यान, ई-रुपी वितरण आणि वापराच्या संपूर्ण प्रक्रियेची चाचणी केली जाईल. यापूर्वी केंद्रीय बँकेने १ नोव्हेंबर रोजी घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल रुपया लाँच केला होता. केंद्रीय बँकेच्या या डिजिटल चलनाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) असे नाव देण्यात आले आहे. उद्यापासून देशातील निवडक ठिकाणी याची चाचणी केली जाईल. ज्यामध्ये ग्राहकापासून ते व्यापाऱ्यापर्यंत ई-रुपी वापरत येईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *