बीआरटीसाठी ३४ लाखांची उधळपट्टी

०८ डिसेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरामध्ये कोट्यवधी रुपये खर्चून बीआरटी मार्ग उभारले आहेत . नियोजनाच्या अभावामुळे हे मार्ग बंद असून , बीआरटी प्रकल्प फसला आहे . असे असताना आता बंद असलेल्या मार्गावर खर्च करण्यासाठी महापालिका प्रशासनाने टॉप गिअर टाकला आहे . पुणे , मुंबई या मार्गावरील बीआरटी मार्ग विस्कळीत असूनही त्यावर तब्बल ३४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये दापोडी ते निगडी , काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता , नाशिक फाटा ते वाकड , सांगवी फाटा ते किवळे , बोपखेल ते दिघी , किवळे ते निगडी भक्ती – शक्ती चौक हे बीआरटी मार्ग आहेत.

या मार्गावर बसथांबे उभारण्यात आले आहेत पुणे मुंबई बसथांब्यांमधील विद्युत साहित्याची मार्गावरील तसेच बॅटरी व इलेक्ट्रिक देखभाल करण्यासाठी बीआरटी विभागाने निविदा प्रक्रिया राबवली . त्यामध्ये चार ठेकेदारांनी सहभाग घेतला . ४४ लाख ६३ हजार रुपयांच्या या निविदेमध्ये मे . विमलाई इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन या ठेकेदाराने २३ टक्के कमी दराने ३४ लाख ३ हजार रुपये दर सादर केला . त्यानुसार पुणे- मुंबई मार्गावरील बीआरटी मार्गावरील बसथांब्यातील विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहे . त्यासाठी ३४ लाख ३ हजार रुपये खर्च करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *