पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या फोटोला काळं फासलं

१९ नोव्हेंबर २०२२

पुणे


काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अनेक शहरात राहुल गांधी यांचा निषेध केला जात आहे. आज पुण्यात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यातील कॉंग्रेस भवनासमोर उभ्या असलेल्या भारत जोडो यात्रेच्या गाडीवर असलेल्या राहुल गाधींच्या फोटोला भाजप कार्यकर्त्यांकडून काळे फासण्यात आले. त्याचबरोबर दुसरा फ्लेक्स फाडण्यात आला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनावर धडक मोर्चा नेला होता. एकत्र येत कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा निषेध केला. भाजप कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसभवनावर गोंधळ केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *