….अन्यथा संपूर्ण राज्यातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू – रमेश हांडे

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
शेतकरी, व्यावसायिक व घरगुती वीज कनेक्शन तोडले तर संपूर्ण राज्यातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येतील असा इशारा संभाजी ब्रिगेड च्या वतीने राज्य संघटक रमेश हांडे यांनी नारायणगाव येथे आज दिला.
नारायणगाव (ता.जुन्नर) येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आज दुपारी जुन्नर तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने वीज कनेक्शन खंडित न करण्याबाबतचे निवेदन वीज वितरणचे अधिकारी श्री सोनवणे यांना देण्यात आले.
यामध्ये शेतकरी,व्यावसायिक,घरगुती वीज कनेक्शन जर कट केले अथवा खंडित केले तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे लावण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देण्यासाठी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटक रमेश अण्णा हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ बागायतदार सुनील पाटे, सुनील खैरे, बाळासाहेब काफरे, सामाजिक कार्यकर्ते ऋषी वाजगे, युवा सेनेचे गौतम ओटी, जुबेर शेख, अभय वारुळे, अमित कांबळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.