डॉक्टरांकडून १० ते १५ दिवस आराम करण्याचा सल्ला – शरद पवार

०५ नोव्हेंबर २०२२

शिर्डी


मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असतानादेखील शरद पवार यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली. शरद पवार हे डॉक्टरांच्या पथकासह विशेष हेलिकॉप्टरने शिर्डी येथे पक्षाच्या शिबिरासाठी दाखल झाले. यावेळी शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आले. तर चेहऱ्यांवर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचे भाषण वाचून दाखवले.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा सुरू आहे. यावेळी पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शरद पवार म्हणाले की, डॉक्टरांनी आपल्याला १० ते १५ दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या १५ दिवसानंतर नियमित कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा लहान कार्यकर्त्यांचा पक्षाच्या विकासात सहभाग आहे ही समाधानाची बाब असल्याचे पवार यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार म्हटले की, शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांची भाषणे ऐकून घेतली आहेत. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी लवकर मिळेल अशी आशा असल्याचेही त्यांनी म्हटले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *