मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी सरकारची कारवाई, मुख्य अधिकारी निलंबित

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ नोव्हेंबर २०२२


गुजरातच्या मोरबी शहरात मच्छू नदीवरील केबल पूल कोसळून 135 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. याप्रकरणी कठोर कारवाई करत राज्य सरकारनं पालिका अधिकारी संदीपसिंग जाला यांना निलंबित केलंय.

पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुजरातमधील ओरेवा या घड्याळ बनवणाऱ्या कंपनीसोबत झालेल्या कराराबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. पुलाच्या दुरुस्तीचं काम ज्या कंत्राटदाराकडं सोपविण्यात आलं होतं, तो अशा कामासाठी पात्र नसल्याचं न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झालं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *