किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून चौकशी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ ऑक्टोबर २०२२


ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केल्याची माहिती समजत आहे. आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले होते. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दादर पोलिसांनी पेडणकरांची चोकशी केली आहे.

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एसआरए घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली होती. या गुन्ह्यांत आतापर्यंत किशोरी पेडणेकरांचं नाव नव्हतं. मात्र, किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकरांची चौकशी केली आहे. त्यामुळे येत्या काळात पेडणेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *