कावळपिंप्रीत वळणावर ट्रक पलटी; दोघे जखमी

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०४ मे २०२२

कावळपिंप्री


जेजुरी महामार्गावरील कावळ पिंपरी (ता.जुन्नर) येथे ट्रक पलटी होऊन दोन जण जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की कावळ पिंपरी येथील पराग ऍग्रो कंपनी जवळ जेजुरी हायवेवर असणाऱ्या वळणावर मंगळवार दि.३ सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सनमायका घेऊन बेल्हे कडून रांजणगावच्या दिशेने जाणारा ट्रक एमएच १२ एसएक्स ७२७१ हा वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात ग्रस्त झाला.यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून वाहक किरकोळ जखमी झाला आहे. या ठिकाणी समोरून आलेले वाहन दिसत नाही.हे वळण धोकादायक ठरत असून अनेक वेळा अपघात झाले आहेत. या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड व गतिरोधक बसविण्याची मागणी सरपंच ताराबाई पाबळे,शरद पाबळे,फकीरा पाबळे, ऋषिकेश वायाळ, गणेश पाबळे व ग्रामस्थांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *