बारावीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

१८ ऑक्टोबर २०२२

पुणे


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांना सरल डेटाबेसवरून ऑनलाइन पद्धतीने नियमित शुल्काने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज ५ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत. शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्य www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. तसेच व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी , नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेचा अर्ज ( आवेदनपत्रे ) ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

नियमित विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत २१ ऑक्टोबर रोजी संपत आहे . आता त्याला मुदतवाढ दिली आहे . शास्त्र , कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाइन अर्ज उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरण्यात येतील . शाळा – महाविद्यालयांना चलन डाऊनलोड करून शुल्क भरण्यासाठी १ ९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे . तर परीक्षा शुल्क आरटीजीएस / एनईएफटीद्वारे भरणा केल्याची किंवा चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलिस्ट पावती जमा करण्यासाठी शाळा महाविद्यालयांना ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे , असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी नमूद केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *