स्मार्ट सिटीतल्या सरकारी शाळांना निदान मूलभूत सुविधा पुरवा : आपची मागणी

पिंपरी-चिंचवड
१३ ऑक्टोबर २०२२


पिंपरी चिंचवड शहरांमध्ये महापालिकेकडून स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक विकास कामे चालू असताना महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांना दिनांक 12 ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.

शिक्षण विषयक समस्यांचे निवेदन घेऊन आप चे शहर प्रशासकीय कार्यप्रमुख यल्लाप्पा वालदोर यांच्या मार्गदर्शनात आप चे प्रतिनिधी मंडळ काल महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाने प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे हे धोरण अवलंबले तरी अंमलबजावणी बाबतीत शासनाची धोरणे ही त्यांच्या घोषणेशी पूरक नाहीत. पिंपरी चिंचवड क्षेत्रातील महापालिका शाळांमध्ये सुविधा देण्याच्या दृष्टीने पुढील मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले आहे. क्रीडा क्षेत्राची महापालिका शाळांना मैदाने  नीट केली जावीत तसेच ज्या शाळेत मैदाने नसतील तेथे मैदाने उपलब्ध करण्यात यावी. ऑलिंपिक खेळतील मार्गदर्शन करण्यात यावे. त्यांना लागणारे खेळाचे साहित्य मोफत पुरवण्यात यावे. एखाद्या खेळात प्रावीण्य असेल तर त्याचा पूर्ण खर्च मोफत करावा.

शालेय विद्यार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या साहित्याचे वेळेवर वाटप करावे सकस आहारा च्या दृष्टीने खिचडी बरोबर इतर गोष्टींचाही समावेश करावा मुलांना खेळाचे साहित्य पुरवण्याबरोबरच वेळात प्राविण्य असणाऱ्या मुलांची ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षणाची सोय करावी. यावेळी आपच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी चेतन बेंद्रे शहर संघटक मनोहर पाटील पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष ब्रह्मानंद जाधव, अजय सिंह आदी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *