अमर मुलचंदाणी आणि त्यांच्या सहकार्यांवर मोका अंतर्गत कारवाई करावी – माजी उपमहापौर डब्बू आसवाणी

पिंपरी-चिंचवड
१३ ऑक्टोबर २०२२


बुधवार दि.१२ ऑक्टोंबर २०२२ रोजी श्रीचंद आसवानी आणि माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या कडून पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते.सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अमर मूलचंदाणी आणि त्यांचे सहकारी संचालक यांनी सेवा विकास सहकारी बँके.बेकायदेशीररित्या, आर्थिक गैरव्यवहार करून बँकेला आर्थिक संकटात टाकले असल्याने बँकेवर आरबीआयने कारवाई केली आणि बँकेचा परवाना दोन दिवसांपूर्वी रद्द केला असल्याचा खूलासा पत्रकार परिषदेत केले.या सर्व घटनेला माजी अध्यक्ष ॲड.अमर मुलचंदाणी आणि त्यांचे सहकारी संचालक हे जबाबदार असून त्यांच्यावर सरकारने मोक्कांतर्गत कारवाई करावी. तसेच यांच्या चाचणी लेखापरीक्षण अहवालातील 429 कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाची वसुली मूलचंदाणी आणि व त्यांच्या सहकारी संचालक मंडळांकडून वसूल करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी आणि श्रीचंद आसवानी यांनी पत्रकार परिषिंदेत केली.

डब्बू आसवानी यांनी सांगितले की, ॲड.अमर मूलचंदाणी हे 2009 पासून या बँकेचे चेअरमन आहेत.बँकेच्या संचालक मंडळाने मागील काळात केलेल्या बेकायदेशीर कर्ज वाटप आणि अनियमित व्यवहारांबाबत आम्ही वेळोवेळी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. पालकमंत्री, सहकार आयुक्त तसेच संबंधित शासकीय संस्थांना निवेदन देऊन दखल घेणे विषयी विनंती केली होती. अमर मूलचंदानी आणि त्यांच्या सहकारी संचालकांवर मोक्कांतर्गत कारवाई करा अशी मागणी डब्बू आसवानी यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *