शेतकरी संघटनेचे नेते लक्ष्मण शिंदे यांचे निधन

ओतूर प्रतिनीधी
१३ ऑक्टोबर २०२२


शेतकरी नेते ओबीसी चळवळीतील महत्वाची भूमिका मांडणारे ओतूर परिसरातील राजकारणात महत्त्वाचे मानले जाणारे व्यक्तिमत्व लक्ष्मण शिंदे यांचे गुरुवार दि.13 ऑक्टोबर रोजी दुखद निधन झाले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कांदा आंदोलन असोत की वीज मंडळावर धडक मोर्चा नेहमीच आपल्या गावठी शैलीतून खडा सवाल करणारे तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी झटणारे शेतकरी नेते म्हणून लक्ष्मण शिंदे यांची ओळख होती. मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांनी उद्योग व्यवसाय उभारले.बालाजी उद्योग समूहाचे ते आधारस्तंभ होते.ओतूर ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी जनतेसाठी अनेक प्रश्न मार्गी लावले. आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *