नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर खासगी बसचा अपघात; पंतप्रधान मोदींकडून आर्थिक मदतीची घोषणा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२


नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातात १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एका खासगी लक्झरी बसने अपघातानंतर पेट घेतल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी एका बाळाच्या मृतदेहासहीत दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा ११ वरुन १३ वर पोहोचला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नेतावाईकाला दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *