स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री शिंदे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०१ ऑक्टोबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. ही बैठक आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखालील पार पडली. यावेळी शिष्टमंडळासह बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्यसैनिकांनी देशाप्रती केलेल्या त्यागाची जाणीव असून त्यांच्या आणि कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असुन शासकीय लाभांपासून ते वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *