बेल्हे,दि.३
विभागीय संपादक रामदास सांगळे
बेल्हे येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन व अणे येथे पोलीस औट पोस्ट मंजूर करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग पवार यांनी मागणी केली आहे.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे बाजारपेठेचे प्रमुख गाव असून दर सोमवारी येथे महाराष्ट्र मधील प्रसिद्ध बैलांचा आठवडे बाजार भरतो. या परिसरात बेल्हे, राजुरी, उंचखडक,जाधववाडी, निमगाव सावा, सुलतानपूर, शिरोली तर्फे आळे, औरंगपूर, पारगाव तर्फे आळे, पिंपरीकावळ, साकोरी,मंगरूळ, झापवाडी,रानमळा, तांबेवाडी, कोंबरवाडी, गुंजाळवाडी, बांगरवाडी, गुळंचवाडी, अणे, पेमदरा, नळावणे, शिंदेवाडी, नवलेवाडी, सुरकुलवाडी,भोसलेवाडी, कारवाडी, आनंदवाडी व वरूनडी आधी सर्व गावांच्या बेल्हे हे मध्यवर्ती असल्यामुळे बेल्हे येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन होण्याची मागणी केली आहे.तसेच पठारावरील महत्वाचे गाव अणे येथे आनंदवाडी, पेमदरा, भोसलेवाडी, कारवाडी, वरुनडी,शिंदेवाडी, नळवणे, नवलेवाडी, सुकुरवाडी या गावांच्या मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे स्वतंत्र पोलीस औट पोस्ट करण्याची मागणी पवार यांनी केली आहे. दिवसेंदिवस गुन्ह्याचे प्रमाण वाढत चालले असून कायदा व सुव्यवस्था योग्य पद्धतीने राखण्यासाठी गरज ओळखून पवार यांनी मागणी केली आहे. बेल्हे येथे नवीन पोलीस स्टेशन तसेच अणे येथे नवीन चेक औट पोस्ट साठी च्या मागणीसाठी रीतसर प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी दिली. तसेच जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.