किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०४ जून २०२२
नारायणगाव
लाला अर्बन को ऑप बँकेचे संस्थापक लोकनेते माजी खासदार स्व . किसनरावजी बाणखेले यांच्या ८५ वा जयंतीचा सोहळा नुकताच नारायणगाव आणि सर्व शाखांमध्ये भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. माजी खासदार स्व . किसनराव ( आण्णा ) बाणखेले यांच्या जयंती निम्मित्त आयोजित कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष युवराज प्रल्हादशेठ बाणखेले, उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, अँड निवृत्ती काळे, रामदास बाणखेले, अशोक गांधी, नितीन लोणारी, नारायण गाढवे, मंगेश बाणखेले, जयसिंग थोरात,संदीप लेंडे, सचिन कांबळे , सुनिता साकोरे , इंदुमती कवडे , सुनील भुजबळ , भानुदास टेंगळे , माजी संचालक जगदीश फुलसुंदर , सचिन कांकरिया , नारायणगावचे सरपंच योगेश पाटे , जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबशेठ नेहरकर , संतोष जाधव , सुहास शहा ,अनिल दिवटे , मनोज भळगट , अतुल कांकरिया , रवींद्र कोल्हे , अमर भागवत , संजय थोरवे , योगेश रायकर , मुख्य कार्यकारी अधिकारी डी . एन . सुरम , उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे , कर्ज अधिकारी प्रमोद कांबळे , संतोष पटाडे , मनोहर गभाले व सेवक उपस्थित होते . बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा मांडत असताना स्व . अण्णांनी समाजातील तळागाळातील घटकांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी ४८ वर्षांपूर्वी १२ ऑगस्ट १९७४ रोजी लाला बँकेची स्थापना केली , बँकेचे उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाला समवेत घेऊन आण्णांचा वारसा समर्थपणे जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत . यामध्ये बँकेच्या एकून १३ शाखा असून मार्च २०२२ या आर्थिक वर्षा अखेर बँकेचे भागभांडवल १४ कोटी ५१ लाख , ठेवी ३६२ कोटी , कर्ज २० ९ कोटी , गुंतवणूक १६३ कोटी ३२ लाख , एकूण व्यवसाय ५७१ कोटी १५ लाख असून बँकेचे ग्रॉस NPA ७.२७ % नेट NPA १.०६ % व निव्वळ नफा २ कोटी ८० लाख रू. झाला आहे.
लाला अर्बन को ऑप बँकेच्या सर्व शाखांच्या वतीने जयंती साजरी
बँकेच्या वतीने प्रत्येक वर्षी सभासदांचा रु २ लाखांचा आपघाती विमा उतरविला जातो . ग्राहकांना बँक देत असलेल्या सुविधांमध्ये अधिकाधिक अत्याधुनिक सेवा पुरविनेसाठी बँक कटीबद्ध आहे . अशी माहिती दिली . बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी बँकेचे कार्यक्षेत्र पुणे जिल्हा असून पुणे जिल्हा लगतचे नवीन ४ जिल्हे अहमदनगर , ठाणे , सोलापूर , सातारा कार्यक्षेत्र वाढीचा प्रस्ताव लवकरच रिझर्व बँकेस सादर करण्यात येत आहे . तसेच मोबाईल बँकिंग सुविधा सुरु करण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे . अशी माहिती दिली . याप्रसंगी प्रास्ताविक करताना बँकेचे जेष्ठ संचालक अशोक गांधी यांनी उपस्थितांचे स्वागत केले . सूत्र संचालन सतिश जाधव यांनी केले तर बँकेचे उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी आभार मानले .