माणुसकीला काळीमा फासणारी घटना जुन्नर शहरातील पंचलिग झोपडपट्टी याठिकाणी घडली आहे…

उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी यांचा बेवारस अवस्थेत पडलेल्या कोवीड रूग्णाला मदतीचा हात

जुन्नर
पवन गाडेकर
निवासी संपादक

जुन्नर शहरातील पंचलिग झोपडपट्टी मधील एका महिलेला कोवीड ची प्राथमिक लक्षणे दिसल्यावर सदर महिलेने तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला परंतु सदर महिला घरी गेली आणि तीची तब्येत अधिक बिघडल्याने शेजारील लोकांनी तिची विचारपूस करणे गरजेचे असताना त्या महिलेला जवळच्या खड्यात उघड्यावर ढकलून दिल्याचे बोले जात आहे…

घडलेला प्रकार काही लोकांनी जुन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी यांना सांगीतला असता ते तात्काळ रुग्णवाहिका घेऊन  घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील उपचारासाठी संबंधित महिलेला ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले...

कोवीड च्या या महामहारीत दिपेशसिंह परदेशी यांनी आजवर कोवीड रूग्ण आणि नातेवाईकांना रूग्णालयात मोफत डबे वाटप असो की कुणाला प्लाझमा ची अथवा कोवीड आजार संबंधित कोणतीही गरज असो दिपेशसिंह परदेशी हे क्षणाचाही विलंब न लावता तत्पर कोवीड रूग्ण आणि नातेवाईकांना मदत करत असल्याने त्यांच्या या कामाचे जुन्नर शहर आणि परिसरातून
कौतुक होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *