रोटरी क्लब निगडीच्या वतीने स्तनपान सप्ताह साजरा  

१० ऑगस्ट २०२२
पिंपरी प्रतिनिधी


रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने शहरात विविध रुग्णालयामध्ये जनजागृती करीत स्तनपान सप्ताह साजरा केला. निगडी क्लबच्या वतीने पिंपरी येथील डीवायपाटील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या मानवी दुग्ध पेढीमध्ये  १८५० लि जमा झाले. वैद्यकीय प्रकल्प अधिकारी, डॉ रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविण्यात आले.

पिंपरी चिंचवड येथील अनेक प्रसुतीगृह व दवाखान्यांमध्ये एकूण 250 नवमातांना स्तनपाना बद्दल माहिती देण्यात आली. त्यांना स्तनपानाचे महत्त्व लिहिले छोट्या पुस्तिका तयार करून वाटण्यात आल्या.1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जगभरात साजरा केला जातो. स्तनपानाचे महत्त्व आणि त्याचे फायदे याची जागरूकता वाढवण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. 2022 चे ब्रीदवाक्य आहे, स्टेप अप फॉर ब्रेस्ट फीडिंग एज्युकेट अँड सपोर्ट. अशी माहिती अध्यक्षा प्रणिता अलूरकर यांनी दिल्ली.

रोटरी क्लब ऑफ निगडी च्या सहकार्याने स्थापन केलेल्या डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी येथील यशोदा दुग्ध पेढी बद्दल माहिती देऊन नवमातांना अधिषेस दूध दान करण्याचे आवाहन करण्यात आले. 200 नव मातांना पौष्टिक डिंक लाडूचे वाटप करण्यात आले. डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी, येथे दुग्ध दान शिबीर घेण्यात आले व 1850 मी ली दूध जमा करण्यात आले.  ज्या मातांनी दुग्धदान केले त्यांना रोटरी क्लब ऑफ निगडी तर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले.

एका नवमातेने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सांगितले की तिला जुळी मुलं झाली होती ज्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते व मातेलाही अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते त्यावेळी या दुग्ध पेढी मुळे बाळांना जीवदान मिळाले आणि तिने दूध जास्त आल्यास दुग्धदान करण्याचे ठरवलेले आहे. ह्या सप्तहातील उपक्रमात, डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी, शकुन क्लिनिक निगडी, पीसीएमसी हॉस्पिटल आकुर्डी,

डॉ शशिकला रन्ना हॉस्पिटल, यमुनानगर, डॉ माटे हॉस्पिटल, निगडी, डॉ नीलम ढमाले क्लिनिक, निगडी, डॉ विनायक महाजन यांचे अश्विनी हॉस्पिटल, केशवनगर, डॉ शिव अगरवाल यांचे साईज्योती अक्सिडेंट हॉस्पिटल, डांगे चौक व लोटस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपळे सौदागर यांचा मोलाचा सहभाग होता. ह्या दवाखान्यांमध्ये स्तनपानावर पाच भित्तीपत्रकचे संच पण लावण्यात आले. डॉ शैलाजा माने, डॉ रवींद्र कदम, डॉ शुभांगी कोठारी, डॉ रंजना कदम, डॉ शशिकला रन्ना यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा प्रणिता अलुरकर, सचिव केशव मनगे ,डॉ रवींद्र कदम, डॉ शुभांगी कोठारी, डॉक्टर रंजना कदम, सोनाली जयंत, डॉक्टर अमोल मेहता, स्मिता इलवे, जयश्री कुलकर्णी, धनश्री कुलकर्णी, रमा मनगे, संजीव अलुरकर , हरविंदर सिंग दुल्लत, कमलजीत कौर दुल्लत, सविता राजापूरकर, साधना काळभोर, सुरेखा उटगे यांनी विशेष परिश्रम घेतले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *