जुन्नर तालुक्यातील १०० शाळांतील दहावी गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०२ ऑगस्ट २०२२


नक्षञाचं देणं काव्यमंच, पुणे व जुन्नर तालुका विकास परिषद, जुन्नर आणि अमर प्रतिष्ठान, नारायणगाव यांच्या संयुक्तविद्यमाने जुन्नर तालुक्यातील शंभर शाळांमधील प्रथम पाच क्रमांक व मुख्याध्यापक यांना सत्कार सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा डाॅ.ए.पी.जी.अब्दुल कलाम सभागृह,जयहिंद शैक्षणिक संकुल,कुरण ता.जुन्नर जि.पुणे उत्साहात साजरा झाला.

कार्यक्रमाचे उदघाटन वृक्षाला पाणी घालुन पर्यावरण संदेश देत दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात जितेंद्रशेठ गुंजाळ (अध्यक्ष-जयहिंद शैक्षणिक संकुल,कुरण)यांच्या शुभहस्ते करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन सचिन लांडे (आयपीएस), महेंद्र गणफुले(प्रवक्ते-मुख्याध्यापक महासंघ,म.रा.),बी.टी.वाघदरे (अध्यक्ष-जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघ), प्रा.राजेंद्र सोनवणे, युवा उद्योजक शुभम नाईक, प्रा.शरद शिंदे, प्रा.सुभाष आंद्रे, लक्ष्मीकांत काजळे,मोहन कुदळे,योगेश आमले, संदीप नाईक, ज्ञानेश्वर काजळे, सौ.शोभा गायकवाड, सौ.कुसुम दुराफे, रत्नाकर ढमाले, अजित शिंदे, धनंजय भालेराव, सौ.अंजनी डुंबरे, इल्वियान मुलानी, साईराजे सोनवणे इ.मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्वक अभ्यास केल्यास यश मिळविता येते.असे आपल्या मनोगतात आयपीएस परीक्षा उत्तीर्ण असलेले सचिन लांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

तज्ञ कौन्सलर,शिक्षणतज्ञ प्रा.शरद शिंदे यांनी दहावी नंतरच्या विविध वाटा या बद्दल माहीती देताना म्हणाले की,”या महत्वाच्या टप्याला आपण पार केलेले आहे.यापुढे इंजिनिअरींग,डाॅक्टर,विविध कोर्स करण्याची संधी पुढे आहेत. आपल्या आवडीनुसार क्षेञ निवडावे.त्यात मन लावुन प्रयत्न केल्यास आपल्या जीवनात अनेक संधी येतात. आपल्याला काय पुढे बनायचे आहे.त्याचा संकल्प पूर्ण आकलन झाला पाहीजे.आज विविध क्षेञात संधी मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहे.”

जयहिंद शैक्षणिक संकुलचे चेअरमन जितेंद्रशेठ गुंजाळ म्हणाले की,”आमच्या जयहिंद संकुलात सर्व प्रकारच्या शैक्षणिक शाखांना अॅडमिशन घेता येते.अनेक गरिब विद्यार्थी वर्गास येथे स्काॅलशिप दिली जाते.अनेकांना विविध माध्यमातुन सहकार्य केले जाते.काही अनाथ मुलांचा संस्था दरवर्षी सर्व खर्च उचलून त्यांना शैक्षणिक संधी देत आहे.”

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा राजेंद्र सोनवणे म्हणाले की,”गेली सोळा वर्षांपासुन हा दहावी गुणवंत सोहळा संस्थेच्यावतीने संपन्न होत आहे.जुन्नर तालुक्या ५५ शाळांनी या वर्षी शंभर टक्के निकाल लावला आहे.याचा अभिमान आहे.भविष्यात पुर्ण जुन्नर तालुका संगणक साक्षर करण्यासाठी चार विभागात मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र उभी केली जाणार आहेत.तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मोफत स्पर्धा केंद्र ही उभी करण्याचा यावेळी संकल्प व्यक्त केला.गुणवंताचा सत्कार हा गुणीजनांना एक शब्बासकीची थापच असते.”

यावेळी जुन्नर तालुक्याचे सुपुञ सचिन लांडे यांना युपीएस परीक्षेत यश मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह, शाल,पुष्पगुच्छ, गौरवपञ देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच मुख्याध्यापक यांना गौरवपञ, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच प्रत्येक प्रथम पाच विद्यार्थी वर्गास सन्मानपञ, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी वादळकार यांनी केले.बहारदार सूञसंचालन प्रा.सुभाष आंद्रे यांनी केले.आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर काजळे यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *