राष्ट्रपती मूर्मु यांच्या विजयाचे आदीवासी पाड्यावरही सेलिब्रेशन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२२ जुलै २०२२

पिंपरी


 

 

देशोच्या सर्वोच्चपदी अर्थात राष्ट्रपतीपदी द्रौपदी मूर्मु यांची निवड झाली. भारतीय जनता पार्टीसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे शहराध्यक्ष व भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांचे वडील किसनराव लांडगे यांनीही या विजयोत्सवात अनोख्या पद्धतीने सहभाग घेतला.

आमदार महेश लांडगे यांच्या वडिलांचा आनंदोत्सव

खेड तालुक्यातील कडुस येथील ठाकर वस्ती या आदीवासी पाड्यावर किसनराव लांडगे यांनी भेट दिली. त्याठिकणी मिठाई वाटप करण्यात आले. दरम्यान, शहर भाजपानेही मंडलनिहाय सहा ठिकाणी जल्लोष कार्यक्रम घेवून आनंदोत्सव साजरा केला. किसनराव लांडगे म्हणाले की, मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदीवासी समाजासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

कडुस येथील ठाकर वस्तीत केली मिठाई वाटप

या ओडीसा येथील संथाल समाजातून आलेल्या पहिल्या आदीवासी महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मूर्मु यांचे नाव देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. याचा आनंद देशभरात साजरा होत आहे, तसचा आदीवासी पाड्यावर, वस्तीवरही झाला पाहिजे. आपण मुख्य प्रवाहापासून बाजुला आहोत, अशी मानसिकता या समाजाची न राहता, शिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर आपण देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, असा आत्मविश्वास या समाजामध्ये राष्ट्रपतींच्या रुपाने निश्चितपणे जागृत होईल, अशा भावनाही लांडगे यांनी व्यक्त केल्या.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *