रांजणगाव MIDC मधील वाढती गुन्हेगारी : कॉन्ट्रॅक्ट सोड नाहीतर पैसे दे : दरमहा खंडणीची मागणी करत जीवे मारण्याचीही धमकी

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
२० जुलै २०२२

शिरूर


शिरूर तालुक्यात असणारी व देशातील एक मोठी व पंचतारांकित म्हणून ओळख असणारी MIDC म्हणजे रांजणगाव MIDC. या MIDC मध्ये जगातील नावाजलेल्या कंपन्या असुन स्थानिक तरुण यात कॉन्ट्रॅक्ट घेत असतात. बऱ्याचदा अशा कॉन्ट्रॅक्ट मधून वाद होऊन पोलिसांमध्ये गुन्हेही नोंद झालेले आहेत.


अशाच प्रकारची घटना सोमवार दि. १८ जुलै २०२२ रोजी रांजणगाव MIDC मध्ये घडली असुन, मौजे राजापूर, ता. श्रीगोंदा, सध्या राहणार शिरूर, येथील कॉन्ट्रॅक्टर दिलीप कांतीलाल थेऊरकर, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांना इसम नामे दत्तात्रय गायकवाड, रा. मलठण, ता. शिरूर, जी. पुणे व त्याच्या सोबतच्या तीन साथीदारांनी मारहाण करून रोख पन्नास हजार रुपये काढून घेत, 3 M कंपनीत चालू असलेले लेबर कॉन्ट्रॅक्ट सोडून दे, नाहीतर आम्हाला दरमहा पंचवीस हजार रु. द्यावे लागतील, असा दम देत मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच थेऊरकर यांच्या म्हणण्यानुसार, दत्ता गायकवाड व त्याच्या सोबतच्या असणाऱ्या अनोळखी साथीदारांनी, थेऊरकर यांच्या चारचाकी वाहनाला, रांजणगाव MIDC मधील अपोलो कंपनीच्या गेट जवळ त्यांची चारचाकी गाडी आडवी लावून, गाडीच्या खाली ओढून लाथा बुक्यांनी मारहाण करत, आपल्या चारचाकी गाडीत जबरदस्तीने बसवून घेऊन जात, कंपनीतील कॉन्ट्रॅक्ट सोडून देण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच थेऊरकर यांच्या चारचाकी वाहनाची काचही फोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचा पुढील अधिक तपास, रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे हे स्वतः करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *