खामुंडी येथे संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
०१ जून २०२२

खामुंडी


खामुंडी (ता. जुन्नर )येथील प्रज्ञाशील सेवा संघ आणि भिम शक्ती महिला राज यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले आणि महामानव गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती चे प्रथमच आयोजन करण्यात आले होते, विशेष म्हणजे जयंती साजरी करण्यासाठी चक्क महिलांनी सर्व सूत्रे हातात घेऊन महिला देखील कुठे कमी नाहीत हे दाखवून दिले. त्याच बरोबर पुरुषांचीही त्यांना साथ लाभल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला असल्याची माहिती प्रज्ञाशक्ती युवा मंचच्या महिलांनी दिली. या कार्यक्रमा निमित्ताने सकाळी पंचशील ध्वजारोहन शुभ पठण बौद्धाचार्य, सर्व महामानवांच्या प्रतिमेची मिरवणूकी,जाहीर अभिवादन सभा, करमणूकीचे कार्यक्रम आणि स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. मिरवणूक प्रसंगी सिद्धी शिंदे हिने लाठी काठी चे प्रात्येक्षीक दाखवून अनेकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी सोनवणे यांनी केले तर प्रास्ताविक गणेश सोनवणे यांनी केले आभार अरुण सोनवणे यांनी मानले. यावेळी सरपंच वनराज शिंगोटे, संभाजी सोनवणे, राजू वाघमारे,सदस्य सत्यवान डुंबरे, बाबाजी शिंगोटे, माजी पोलीस पाटील अशोक सोनवणे, विशाल गडगे, राजू वाघमारे हेमंत सोनवणे, प्रशांत सोनवणे, रेश्मा केदारी,योगेश सोनवणे व परिसरातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *