आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली मंगलदास बांदल यांना अटक – हेमंत शेडगे, पो. नि. शिक्रापूर

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. 26/05/2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे माजी उपाध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती, मंगलदास बांदल यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कुलमुखत्यारपत्र व बनावट पुरवणी दस्त तयार करून, कर्ज काढून थकबाकी करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बांदल यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक करून, शिरूर पोलिस स्टेशनच्या कस्टडीत ठेवण्यात आले असल्याची माहिती, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलीय. बांदल यांना याच आठवड्यात दुसऱ्यांदा अटक झाली असून, त्यामुळे शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहिती नुसार –
फिर्यादी दत्तात्रय मांढरे यांच्याशी मंगलदास बांदल यांनी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून, सध्या मला पैशांची खुप गरज आहे असे सांगत, फियादीचे नावावर खोटे खरेदीखत करून, त्याआधारे शिवाजीराव भोसले सहकारी बॅकेतुन ८ लाख रूपये कर्ज प्रकरण करून ती रक्कम आरोपीने स्वतःच्या फायदयासाठी वापरली. त्यानंतरही पुन्हा सदर मिळकतीवर कर्जाकरीता फिर्यादीचे कुलमुखत्यारपत्र व बनावट पुरवणी दस्त तयार करून, फिर्यादीचे संमतीशिवाय शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून १ कोटी २५ लाख रुपये कर्ज घेवुन, ते स्वता:च्या फायदयाकरीता वापरले असुन त्याचे हप्ते न भरता, २ कोटी ५० लाख रुपये थकबाकी केली.
याप्रकरणी दत्तात्रय मांढरे (रा. शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यावरून,

मंगलदास विठ्ठलराव बांदल (रा. शिक्रापूर ता. शिरूर जिल्हा पुणे) यांना फसवणूक प्रकरणी अटक केली असून, त्यांच्यावर शिक्रापूर पो. स्टे. गुन्हा रजिस्टर नंबर ३६७/२०२१, भा.दं.वि.क. ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब), ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, हेमंत शेडगे हे स्वतः करीत आहेत.

 त्याचप्रमाणे, जर आणखी कुणाची अशा प्रकारे फसवणुक झाली असेल, तर शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन, पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *