अबब चिखली जाधववाडी च्या बैलगाडा शर्यतीत बैलगाडा शौकिनांना रोज ३.५ टन कलिंगड मोफत

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२७ मे २०२२

चिखली


भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत चिखली जाधववाडी येथे उद्यापासूनच सुरू होणार आहे. या स्पर्धेला जेसीबी , बोलेरो, ट्रॅक्टर, २०० मोटार सायकल अशा बक्षिसांची खैरात होणार आहे. या बैलगाडा शर्यतीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

आयोजक फायनल सम्राट माजी महापौर राहुल जाधव , नितीन अप्पा काळजे आणि जय हनुमान बैलगाडा मंडळ यांच्यावतीने ना भूतो ना भविष्य अशी ही बैलगाडा शर्यत होणार आहे. याचे पडद्यामागचे सगळे नियोजन इव्हेंट मास्टर महेशदादांचे भाऊ कार्तिक लांडगे हे पहात आहे. त्यांच्या वतीने या भव्य बैलगाडा शर्यतीसाठी येणाऱ्या सगळ्या बैलगाडा शौकीनांसाठी दररोज ३.५ टन कलिंगडाच्या फोडी मोफत वाटण्यात येणार आहे. त्यासाठी कलिंगड कापण्यासाठी १० जणांची स्वतंत्र टीम आणि वाटपासाठी २५ जणांची टीम प्रत्येकाला जागेवर नेऊन देण्यासाठी सज्ज असणार आहे. त्याचंबरोबर उन्हाचा तडाखा असल्यामुळे स्वच्छ पाण्याचे बाटल्यांचेही वाटप करण्यात येणार आहे.

या स्पर्धेची तयारी गेली कित्येक दिवस सुरू आहे. स्पर्धेसाठी बनवलेली स्वतंत्र धावपट्टी, धावपट्टीच्या बाजूला बसण्यासाठी टप्याटप्याची आसन व्यवस्था. उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून केलेली शेड, घाटाच्या वर बैलगाडा गेल्यावर बैल आडवण्यासाठी केलेले भव्य आळे अशी जय्यत तयारी करण्यासाठी ८जेसीबी , ४ ढंपर, ५ ट्रॅक्टर, १० ट्रक आणि शेकडो कामगार दिवसरात्र काम करत होते.

या स्पर्धेदरम्यान सर्व बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकिनांनी शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन अयोजकांच्या वतीने आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडून करण्यात आले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *