पाळीव कुत्र्याने वाचवले मालकाचे प्राण, बिबट्याचा हल्ल्यात कुत्रा जखमी

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०६ मे २०२२

आमोंडी


आमोंडी ता.आंबेगाव येथे बुधवार दि.४ रोजी रात्री शेतात पिकाला पाणी भरत असताना, शेतकरी कु.सुमित रंगनाथ फलके यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असता त्यांच्या घरातील पाळीव निष्ठावान कुत्र्याने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या मालकाचे प्राण वाचवल्याने त्याचे गावकऱ्यांकडुन कौतुक केले जातेय. तसेच या ठिकाणी “तेरी मेहरबानीया” या चित्रपटाची आठवण आल्या शिवाय राहत नाही.

फलके हे रात्री ३:३० वाजता त्यांच्या गट नंबर ५८० मध्ये शेतात पाणी भरत असताना समोरून बिबट्या,त्यांच्या अंगावर धावून आला होता. आपल्या मालकावर बिबट्या हल्ला करतोय हे पाहुन त्यांच्या पाळीव कुत्र्याने मालकाचे प्राण वाचवण्यासाठी बिबट्या बरोबर लढाई केली, त्यात तो गंभीर जखमी झाला असल्याची माहिती प्रवीण फलके यांनी दिली असून तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *