करणी सेना महासंमेलन संभाजीनगर (औ.बाद) मध्ये

लक्ष्मण दातखिळे
बातमी प्रतिनिधी
०८ एप्रिल २०२२


देव देश धर्मासाठी काम करणाऱ्या कट्टर हिंदुत्ववादी करणी सेना या संघटनेचे राष्ट्रीय महासंमेलन करणी सेना राष्ट्रीय अध्यक्ष सुरजपालसिंह अम्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवीचंदसिंह बारबाल यांच्या अध्यक्षतेखालील रविवार दि. १० एप्रिल रोजी संभाजीनगर ( औ.बाद ) या ठिकाणी संपन्न होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल प्रदेश अध्यक्ष अतुलसिंह परदेशी यांनी दिली. रविवार दि. १० एप्रिल रोजी होणा-या या राष्ट्रीय संमेलनाची सुरुवात संगीत रजनी व राम जन्मोत्सव करून सकाळी ०९ वाजता होणार आहे. या महासंमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून भागवत कराड केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, रावसाहेब दानवे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री उपस्थितीत राहणार आहेत.

राष्ट्रीय अध्यक्ष सुरजपालसिंह अम्मू यांची प्रमुख उपस्थिती

प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, माजी खासदार जालना उत्तमसिंग पवार, विधान परिषद आमदार सुरजितसिंग ठाकूर, संभाजीनगर ( पश्चिम ) आमदार अतुल सावे, कन्नड – सोयगाव चे आमदार उदयसिंग राजपूत, संभाजीनगरचे महापौर नंदकुमार घोडेले, मुख्याधिकारी भागवत बिघोत, अतिरिक्त जिल्हाधिकारी नांदेड खुशालसिंग परदेशी, भा.ज.पा शहराध्यक्ष संजय केनेकर, भा.ज.पा जिल्हाध्यक्ष विजय औताडे, न्युरो सर्जन डॉ. जीवन राजपूत, जिल्हा अध्यक्ष काँ. कमिटी जालना राजभाऊ देशमुख, उद्योजक रामसिंग बहुरे, करणी सेना दिल्ली प्रदेश अध्यक्ष बादल तवर, अर्थ व बांधकाम सभापती किशोर नाना बलांडे, महिला राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती. राखी गर्ग, न्युरो सर्जन डॉ. गणेश राजपूत, राष्ट्रीय उपाध्यक्ष करणी सेना पंकजसिंह ठाकूर, किसान करणी सेना राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर आप्पा ढोमसे, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, नगरसेवक राजू भाऊ वैद्य, उद्योजक एन. जे. पाटील, कार्यकारी अभियंता शहर विभाग प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता महापारेषण जितेंद्रसिंग पाटील, फुलंब्री चे सभापती चंद्रकांत जाधव, विश्व हिंदू परिषद संजयसिंग कच्छवे, जी.एस.टी अधिकारी तोताराम बहुरे, राष्ट्रीय सचिव करणी सेना संजय राणा आदी उपस्थित राहणार आहेत.


कार्यक्रमाचे आयोजक महिला प्रदेशाध्यक्षा संध्याताई राजपूत युवा प्रदेशाध्यक्ष अमोल ठाकरे,किसान शक्ती प्रदेशाध्यक्ष प्रेमसिंह धनावत युवा मोर्चा अध्यक्ष जयसिंग राजपूत खोकड महिला किसान शक्ती प्रदेशाध्यक्ष अंजनाताई राजपूत, करणी सेना प्रदेश उपाध्यक्ष विलास कचवे, प्रदेश प्रवक्ते दिनेशसिंह राजपूत, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष उर्फ बाबा परदेशी तसेच तमाम करणी सेना पदाधिकारी आणि सर्वच हिंदुत्ववादी संघटने मधील सभासदांनी सदर महासंमेलनासाठी उपस्थितीत राहण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष देवीचंदसिह बारवाल यांनी केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *